पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज शुक्रवार दी ३ फेब्रुवारी रोजी चक्री भजनाने माघी यात्रेची सांगता झाली. औसा येथील विरनाथ मल्लिनाथ संस्थान यांच्या वतीने ह भ प गुरुनाथ बाबा अवसेकर यांनी आज सकाळी सभा मंडप येथे चक्री भजन सादर केले. पायात चाळ, हातात चिपळ्या, डोक्यावर पागोटे आणि डीबडी च्या तालावर चक्री भजन सादर करण्यात आले. सुमारे २५० वर्षांची परंपरा आहे. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर,ह भ प जळगावकर महाराज सर्व मंदिर समितीचे पदाधिकारी , व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सुमारे दोन तास हे चक्री भजन सुरू होते, शेकडो भाविकांनी तल्लीन होऊन सावळ्या विठू रायाच्या नामाचा गजर करीत हा अनुपम्य सोहळा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
0 Comments