पंढरपूर (प्रतिनिधी)छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर हॉलीबॉल संघ यांच्या वतीने आखिल भारतीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन व स्पर्धेचे उद्घाटन सोमवार दि .२७ फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथील पी टी ग्राउंड येथे करण्यात आले .
यावेळी प्रमुख पाहुणे आमदार श्री प्रशांत परिचारक, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे, दि पंढरपूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे, ऑल इंडिया शूटिंग संघटनेचे अध्यक्ष रवींद्र सिंग तोमर राज्याचे अध्यक्ष साळवी, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन श्री कैलास खुळे, नगरसेवक गणेश अधटराव,निकम, गावडे, सुभाष मस्के, सोमनाथ कराळे,शशी भोसले, धनवडे, पवार सर, जयवंत भोसले, आदी मान्यवरांच्या हस्ते आखिल भारतीय हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना मा. आ.श्री प्रशांत परिचारक म्हणाले, पंढरपूर शहर तसेच तालुक्यात विविध क्रीडा खेळाडू तयार व्हावेत, त्यांना खेळाची माहिती व्हावी, यासाठी अशा स्पर्धा घेणे गरजेचे आहे. पंढरपूर येथे अशा भव्य राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा प्रथमच होत आहेत,या निमित्ताने नवीन क्रीडा प्रकार कळेल.यापूर्वी राष्ट्रीय पातळीवरील तिरंदाजी,कुस्ती, कबड्डी स्पर्धा आपण आयोजित केल्या पण हा शूटिंग बॉल म्हणजेच हॉलीबॉल स्पर्धा प्रथमच होत आहेत, अशा प्रयत्नातून नवीन खेळाडू तयार व्हावेत, असे ते म्हणाले.या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत महाराष्ट्र,उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश,पंजाब,उत्तराखंड,हरियाणा,कर्नाटक,तामिळनाडू, ओरिसा आदी राज्यातील टीममध्ये सामने होणार असून तीन दिवस स्पर्धा असणार आहे.


0 Comments