पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान (दादा) आवताडे यांनी आपल्या मतदारसंघात सध्या रस्ते,वीज,पाणी,शिक्षण,आरोग्य आदी विकासकामांना भरघोस आणि भरीव असा निधी आणून धोरणात्मक विकासाचा सपाटा सुरू केला आहे. आज मंगळवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील पडोळकर वस्ती (कायरपट्टा) रस्त्याचे भूमिपूजन सोहळा मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट *सभापती सोमनाथ आवताडे* यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.
यावेळी सभापती महोदय यांनी बोलताना सांगितले की, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण निधीची मागणी करताना आपण कोणतीही कसर ठेवू नका आपण मागण्या केलेल्या प्रत्येक बाबींची आमदार साहेबांच्या माध्यमातून पूर्तता करण्यात येईल. मतदारसंघाच्या सर्वांगीण उत्कर्षाचा ध्यास घेतलेले एक लोकप्रतिनिधी म्हणून मा. दादासाहेब यांची मतदारसंघांमध्ये ख्याती आहे. कोणताही राजकीय आकस मनामध्ये न ठेवता आमदार महोदय यांनी नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या विकासाला प्राधान्य देऊन विकासाची गंगा नेटाने संक्रमित केली आहे. आमदार महोदय यांच्या सार्वजनिक सामाजिक व राजकीय कार्यक्षेत्रामध्ये त्यांची सोबत करणाऱ्या या गावाच्या विकासासाठी चौफेर कायापालटासाठी यापुढेही असाच निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन सभापती महोदय यांनी यावेळी दिले.
सदर प्रसंगी श्री विजय (दादा) देशमुख,श्री तुकाराम (आबा) कुरे,श्री समाधान घायाळ,श्री बाळासाहेब देशमुख,श्री भास्कर घायाळ,श्री मारुती काळे,श्री वैभव लिंगे,श्री लक्ष्मण जाधव,श्री सचिन देशमुख,श्री हनुमंत ताटे,श्री नौशाद शेख,श्री सुनिल भुसे,श्री दाजी खिलारे,श्री दत्ता भुसे,श्री वासुदेव माने,श्री समाधान मासाळ,श्री जगन्नाथ पडोळकर,श्री दादा पडोळकर,श्री राजू पडोळकर,श्री नवनाथ खोत,श्री अविनाश मोरे साहेब व आदी मान्यवर उपस्थित होते.


0 Comments