LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने कर वसुलीसाठी धडक मोहीम 48 नळ कनेक्शन तोडले वीस प्रॉपर्टीवर होणार सील करण्याची कारवाई

 मुख्याधिकारी अरविंद माळी यांची माहिती

पंढरपूर (प्रतिनिधी)



पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांनी कराची रक्कम मोठ्या प्रमाणात थकवल्याने सदर थकबाकीदार यांच्या कडून कराची रक्कम वसूल करणे कामी विशेष वसुली मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली 


पंढरपूर शहरांमध्ये १९०००  मालमत्ता धारक असून सध्याची परिस्थिती पाहता शहरातील काही मालमत्ता धारक यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कराची व गाळा भाड्याची रक्कम थकीत येणे बाकी आहे याबाबत नगरपालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी गजानन गुरव  यांनी कर वसुली बाबतचा आढावा घेतला होता कराची मोठ्या प्रमाणात रक्कम थकीत असल्याने कडक कारवाई करावी अशा सूचना दिल्या होत्या तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुद्धा कराची रक्कम वसूल करावी म्हणून वारंवार सूचना देण्यात येत आहेत शासनाने सुद्धा सन २०२२-२०२३  या आर्थिक वर्षात नागरी उत्पन्न वाढवण्यासाठी च्या दृष्टीने विशेष वसुली मोहीम राबवण्याचे आदेश दिलेले आहेत त्यास अनुसरून नगरपरिषदेने शहरातील सर्व मालमत्ताधारक यांना मागणी बिल, मागणी नोटीसा, जप्तीपूर्व सूचना नोटीसा ही बजावलेले आहेत परंतु थकबाकीची रक्कम वसुली होतं नसल्याने उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर व कर अधिकारी बाळासाहेब कांबळे यांच्या अधिपत्याखाली कर्मचाऱ्यांची ९ पथके तयार केले असून या विशेष वसुली पथकामध्ये ३६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे तसेच शहरातील मालमत्ता धारक यांच्याकडे मागील येणे  १३ कोटी ७२ लाख

चालू येणे.    १४ कोटी ८ लाख

एकूण येणे   २७ कोटी ८० लाख

सन २०२३ मध्ये एकूण जमा रक्कम १३ कोटी 

३१ मार्च २०२३ अखेर एकूण येणे बाकी रक्कम रू १५ कोटी आहे

 ज्या मालमत्ता धारकाकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी रक्कम येणेबाकी आहे अशा ४० मालमत्ताधारकांची नळ कनेक्शन तोडण्यात आलेली असून शहरातील १००० मालमत्ता धारक यांना जप्तीपूर्व सूचना नोटीसा  बजावण्यात आलेले आहेत तरी सुद्धा काही मालमत्ताधारक व गाळेधारक यांनी कराची व भाड्याची रक्कम न भरल्याने अशा मालमत्ताधारकांच्या  मालमत्ता व गाळे लवकरच सील करण्यात येणार आहेत  

तरी पंढरपूर शहरातील नागरिकांनी आपली कराची व शॉपिंग सेंटर भाड्याची रक्कम त्वरित भरावी अन्यथा नाईलाजस्तव  जप्ती व इतर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी यावेळी दिला

Post a Comment

0 Comments