LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

कोळी समाजाच्या समस्येसाठी आ.समाधान आवताडे आक्रमक.

 


पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार श्री समाधान आवताडे यांनी आज शनिवार दि २५ मार्च रोजी मुंबई येथील अर्थसंकल्पीय विधानसभा अधिवेशनात कोळी समाजाचा अत्यंत जिव्हाळ्याचा महादेव कोळी जात वैधता प्रमाणपत्र बाबत प्रश्न उपस्थित करून  कोळी समाजाला योग्य लाभ देऊन न्याय देण्यात यावा.तसेच तसा शसान निर्णय जाहीर करण्यात यावा, यासाठी आग्रही मागणी केली.

आ. समाधान आवताडे यांनी आक्रमक पवित्रा घेऊन महादेव कोळी समाजाला योग्य लाभ द्यावा अशी ठोस मागणी केली आहे

ते म्हणाले २०११  साली करण्यात आलेल्या जनगणना नुसार आमच्या सोलापूर जिल्ह्यात महादेव, ढोर,मल्हार,पारधी या जातीचे कोळी बांधव५१९२१ राहतात.   या लोकांना प्रांताधिकारी महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र देतात,मात्र पुणे जात वैधता प्रमाणपत्र मंडळ ते गृहीत धरत नाही. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील महादेव कोळी समाजाला शबरी गृह योजना , बिरसा मुंडा योजना तसेच विविध  शासकीय योजना,आरक्षण याचा लाभ मिळत नाही.

ही लोकसंख्या गृहीत धरून राजकीय आरक्षण घेतले जाते,विकासनिधी घेतला जातो,पण प्रमाणपत्र देताना बोगस समजले जाते.मग हे लोक नक्की कोण आहेत.हे राज्य सरकारने जाहीर करावे.या लोकांचा प्रश्न सोडविण्यासठी तज्ञ समिती नेमणार का? किंवा महादेव कोळी प्रमाणपत्र विना अट, सुलभरित्या मिळणार का? याबाबत काय निर्णय घेणार ते स्पष्ट करावे, अशी रोखठोक भूमिका घेतली.

Post a Comment

0 Comments