LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरीत विचित्र हवामानामुळे नागरिक आजाराने बेजार.

 


पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील ज्येष्ठ नागरिक,महीला तसेच लहान मुले सध्या पडत असणाऱ्या विचित्र हवामानामुळे विविध व्हायरल इन्फेक्शन होऊन आजारी पडत असल्याचे दिसून येत आहे.सर्दी, पडसे ,खोकला  ताप येणे, थंडी वाजून येणं अशा प्रकारचे आजार वाढत आहेत. यामुळे खाजगी दवाखाने, रुग्णालयात गर्दी दिसून येते. दिवसा कडक ऊन, आणि रात्री व पहाटे बोचरी थंडी असे हवामान पडत आहे. यामुळे वातावरण दूषित होत आहे, सर्दी,डोकेदुखी,अंगदुखी  हातापायाला मुंग्या येणे ,जीव कासावीस होणे अशा प्रकारचे विकार सध्या जाणवत आहेत,

आता कोरोना आजाराची भीती कमी असली तरी अनेक दिवसांच्या प्रदीर्घ खोकल्याने वयस्कर मंडळी हैराण झाले आहेत.तसेच शाळकरी मुले मातीत, धुळीत खेळत असतात तसेच नंतर ही मुले हात पाय स्वच्छ धुवून येत नाहीत, यामुळे मुलांमध्ये दमा, श्वसनाचे विकार वाढत आहेत. आता वार्षिक परीक्षा जवळ येत असून अभ्यास वाढत आहे. शाळकरी मुले वारंवार आजारी पडत असल्याने परीक्षा जवळ येत असतानाही शालेय मुलांची शाळा बुडत आहे.  आधीच पंढरपूर शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य  असून आता कडक उन्हाळा सुरू होत आहे. धूळ,रस्त्यावरील घाण, भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट,त्यापासून वाढणारी घाण , विविध ठिकाणी डबक्यात साचलेले पाणी यामुळे निर्माण होणारे डास, चिलटे, माशा आदी उपद्रवी कीटक वाढत असल्याने विविध संसर्गजन्य आजार, रोगांचा प्रसार वाढत आहे.  नगरपालिका आरोग्य विभागाने यात लक्ष घालून विविध जंतुनाशक  फवारण्या व वाढते आजार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे.

Post a Comment

0 Comments