पंढरपूर ..प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार सुस्ते अजनसोंड बिटरगाव परिसरातील
ईश्वर वठार बिटरगाव
हा रस्ता गेल्या अनेक दिवसापासून स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे नादुरुस्त होता या रस्त्यावरून नागरिकांना उसाची नियम करणे द्राक्ष डाळिंब व इतर फळ पिकाची वाहतूक करणे जिकरीचे झाले होते गेल्या अनेक दिवसापासून या भागातील नागरिक हा रस्ता व्हावा यासाठी मागणी करत होते या भागातील शेतकरी नेते माऊली हळणवर हे शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत होते
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आमदार प्रशांत मालक परिचारक व आमदार गोपीचंद पडळकर यांनी अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र दिले होते व विनंती केल्यावरून या रस्त्यासाठी राज्याच्या बजेटमध्ये दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले हा रस्ता मंजूर झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला यासाठी आज आमदार प्रशांत मालक परिचारक यांचे जाहीर आभार मानण्यासाठी ईश्वर वठार येथील पांडुरंग परिवाराचे सर्व कार्यकर्ते यांनी आज आमदार प्रशांत मालकांचा जाहीर सत्कार केला व आभार मानले
यावेळी
जिल्ह्याचे आमदार प्रशांत मालक परिचारक यांचा पांडुरंग परिवाराचे युवा नेते ज्ञानेश्वर गुडंगे यांचे हस्ते ईश्वर वठार येथील ग्रामस्थांच्या वतीने आज सत्कार केला व मालकाचे आभार मानले..... यावेळी भाजपा किसान मोर्चाचे माऊली भाऊ हळणवर, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक नारायण लवटे सर भारत नाना पांढरे सुरेश खांडेकर बिरुदेव खांडेकर प्रशांत लवटे रवींद्र गुंडगे रामभाऊ तरंगे सुस्ते येथील रवींद्र जाधव बाळासाहेब पवार यांच्यासह ईश्वर वठारचे ग्रामस्थ उपस्थित होते


0 Comments