पंढरपूर प्रतिनिधी -
येथील विणे गल्लीमध्ये अज्ञात तरुणांकडून "कोयत्याने वार" नागरिकात घबरातीचे वातावरण, पुण्यानंतर पंढरपुरात कोयते गॅंग सक्रिय पंढरपूर शहरातील मध्यवस्ती येथे विणे गल्ली ते विजापूर गल्ली या दरम्यान अज्ञात तरुणांनी कोयत्याने वार केल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यानंतर पंढरपुरातच कोयता यांचा वावर सुरू झाला असल्याने नागरिकात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
त्याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की अज्ञात तरुणांनी एका तरुणावर कोयत्याने वार केले असल्याने ही घटना मंदिर परिसरातील विणे गल्ली ते विजापूर गल्ली या दरम्यान घडली असल्याची शहर पोलिसांकडून सांगण्यात आले यामुळे नागरिकात भिंतीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये एक तरुणजखमी असून तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे असे समजते
दरम्यान यापूर्वी शहरात टोळी युद्धाच्या घटना घडल्या आहेत यामध्ये अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर पंढरपूर शहरातील नागरिक अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून कायमच चार हात लांब असते. मागील काही दिवसांपूर्वी शांत असणारे पंढरपूर दर चार ते आठ दिवसानंतर अशा गुन्हेगारी घटनांमुळे पुन्हा पुढे येत आहे पंढरपुरातील गुन्हेगारी कमी करण्यास पोलिसांचे अपयश मानले जात आहे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही त्यामुळेच वारंवार अशा घटना घडत असल्याचे दिसून येते यासाठी शहर पोलिसांनी वेळीच अशा गुन्हेगारीला चाप लावावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे . सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण घुगे करीत आहेत.


0 Comments