LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

विशाल उमाकांत भाकरे यांचे दुःखद निधन. पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर येथील विपणन

 


वृत्तपत्र अधिकारी विशाल उमाकांत भाकरे यांचे आज शुक्रवार दि २४ मार्च रोजी  सकाळी अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले. विशाल भाकरे हे

दैनिक पुण्यनगरी, पंढरपूर विभागीय कार्यालयासाठी मार्केटिंग, वसुली प्रतिनिधी म्हणून नुकतेच रुजू झालेले होते. विशाल उमाकांत भाकरे (वय ४६) यांचे शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दुपारी ४.३० वाजता येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात थोरला भाऊ वैभव भाकरे व एक विवाहित बहीण आहे.

मूळचे औरंगाबाद येथील रहिवाशी असलेले भाकरे कुटुंबीय पंढरपूर येथील चंद्रभागा तीरावर श्री विप्र दत्त मंदिरात वास्तव्यास येऊन याच ठिकाणी स्थायिक झाले होते.

सुमारे तीन वर्षांपूर्वी वडील, तर दोन वर्षांपूर्वी आईचे ही हृदयविकाराने निधन झाले. अविवाहित असलेले दोघे भाऊ श्री विप्र दत्त मंदिरात राहत होते. थोरले भाऊ पूजा विधीचे काम करतात. धाकटे असलेले विशाल भाकरे यांनी यापूर्वी दैनिक सकाळ, दैनिक तरुण भारत, दैनिक पुढारी या दैनिकांमध्ये मार्केटिंग, वसुली प्रतिनिधी म्हणून काम केले. सध्या ते दैनिक पुण्यनगरी पंढरपूर विभागीय कार्यालयात कार्यरत होते. अत्यंत कष्टाळू,प्रामाणिक आणि सरळमार्गी असणारे विशाल भाकरे यांचे अशा जाण्याने पंढरीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments