LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने भाडे व कर वसुलीसाठी ४ गाळे सील

मुख्याधिकारी अरविंद माळी यांची धडक कारवाई

 पंढरपूर (प्रतिनिधी)


पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील मालमत्ता धारक व शॉपिंग सेंटर मधील गाळेधारक यांच्याकडे   मोठ्या प्रमाणात कराची व गाळे भाड्याची रक्कम थकीत राहिल्याने विशेष वसुली पथकाद्वारे वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे

नगरपरिषदेने थकीत  मालमत्ताधारक व गाळे धारक यांना मागणी बिल, जप्तीपूर्व सूचना नोटीसीद्वारे  वारंवार  कराची रक्कम व गाळे भाड्याची रक्कम भरणे बाबत सूचना देऊन सुद्धा त्यांनी कराची व गाळे भाड्याची रक्कम न भरल्याने आज गिरीश हनुमंत काळे, श्रीकांत बलभीम अवधूतराव, रवी शंकर घाडगे ,गणपत राजाराम कदम यांचे गाळे स्वतः मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी या नेमलेल्या विशेष वसुली पथकाद्वारे त्या ठिकाणी जाऊन  सील केले तसेच पंधरा ठिकाणचे २नळ कनेक्शन ही तोडण्यात आले संपूर्ण नगरपालिका प्रशासन हे कर व भाडे वसुलीसाठी ॲक्शन मोडवर आल्याने मालमत्ता धारक व गाळे धारक यांनी भाडे व कराची रक्कम भरण्यास सुरुवात केली आहे यावेळी बोलताना मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले की उद्यापासून ही मोहीम अजून कडक करण्यात येणार असून  गाळेधारक अथवा  मालमत्ताधारक   यांनी आपली कराची व गाळे भाडेची थकीत व चालू वर्षाची रक्कम त्वरित नगर परिषदेकडे भरावी अन्यथा त्यांच्यावरही जंगम मालमत्ता जप्तीसारखी कटू कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा लागेल इशारा दिला असून  मालमत्ता धारक व गाळेधारक यांनी कराची व गाळे भाड्याची रक्कम त्वरित भरून नगर परिषदेस  सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी   यांनी  केले आहे या  कारवाईच्या वेळी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर व कर अधिकारी बाळासाहेब कांबळे वॉरंट लिपिक संभाजी देवकर, प्रभाग लिपिक पांडुरंग देवमारे, विजय ढवळे, शॉपिंग सेंटर लिपिक चेतन चव्हाण आरोग्य अधिकारी शरद वाघमारे,अनिल अभंगराव,उमेश कोटगिरी,समीर शेंडगे व सर्व वसुली टीम उपस्थित होते

Post a Comment

0 Comments