गेली 60 ते 70 वर्ष महादेव कोळी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समाज बांधवांच्या विनंती वरुन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आ. समाधान आवताडे यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करुन समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून शासनास त्यांचा जाब विचारला. त्यामुळे आमदार साहेबांचे समाजाचेवतीने आभार व्यक्त करण्यासाठी महादेव कोळी समाज बांधवांचेवतीने मंगळवेढा सूतगिरणी येथे दादांची स्नेहभेट घेवून महादेव कोळी समाजाचे गाढे अभ्यासक आदरणीय प्राध्यापक शरण खाणापुरे सर यांचे शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व महाराष्ट्रराज्यातील समस्त महादेव कोळी समाजाचेवतीने त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.*
*यावेळी प्राध्यापक श्री शरण खाणापुरे सर यांनी ब्रिटिश राजवटी पासून ते आजपर्यंतचे सर्व सामाजीक,राजकीय,भौगोलिक व अध्यात्मिक लिखित स्वरुपातील शेकडो पुरावे आमदार साहेबांना दाखवून त्यावर सखोल चर्चा केली.शासन विशिष्ट राजकीय नेत्यांना व आदिवासी मंत्र्यांना हाताशी धरुन otsp मधील 75 लाख समाज बांधवांवर कसा जाणिवपूर्वक अन्याय करत आहे हे पुराव्यानिशी पटवून दिले.*
आमदारांनी एक तास समाजाचा मुळ प्रश्न समजून घेतला व थोड्याच दिवसात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,आदिवासी मंत्री,सचिव तसेच राज्याचे मुख्यसचिव यांचे सोबत समाजातील तज्ञ व अभ्यासू टिम सोबत बैठक लावली जाईल व समाजाचा प्रश्न सोडविला जाईल असे सर्व बांधवांना आश्वासन दिले.*
*यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बळवंतराव सरांनी आपल्या प्रास्ताविका मध्ये समाजावर होणाऱ्या अन्यायाला आपल्या माध्यमातून भविष्यात 100% न्याय मिळेल तेव्हा आपण समाजाच्या पाठिशी उभे रहावे अशी विनंती केली.*
*याप्रसंगी कोणताही गट-तट किंवा पक्ष न पाहता पंढरपूर,मंगळवेढा,बार्शी व धुळे येथील अनेक नेतेमंडळी व समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.*


0 Comments