LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पुण्यात खासदार गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजाराने निधन.

 


पंढरपूर (प्रतिनिधी) पुणे येथील खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्यावर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.  पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांचे निधन झाले.  अंत्यविधी संध्याकाळी ७  वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहे. १९७३ पासून ते राजकारणात सक्रिय होते. २०१९ ला पुण्याचे खासदार म्हणून निवडून आले.

सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. १९९५ पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. टेल्को कंपनीत १९७३ ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. १९८३ला पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.एक 

महिन्यांपूर्वी कसबा पोटनिवणुकीसाठी ऑक्सिजन लावून आणि व्हिलचेअरवर भाजपच्या मेळाव्यासाठी पोहचले होते. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. कसबा मतदार संघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते.

Post a Comment

0 Comments