प्रतिनिधी पंढरपूर.
मोहोळ _आळंदी राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ या रस्त्याचे काम सुरू असून ईश्वर वठार हद्दीतील उजनी कालव्याच्या मायनर क्रमांक सात हा या हायवे च्या बाजूने जात होता परंतु हायवेच्या कामामुळे या कॅनलची मोडतोड झाली होती गेल्या एक वर्षापासून शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाणी मिळत नव्हते अनेक वेळा शेतकऱ्यांनी निवेदन दिली नॅशनल हायवे च्या कार्यालयामध्ये हेलपाटे मारले ठेकेदारांची भेट घेतली परंतु हे काम न झाल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळून जात होती आज भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणवर यांनी आक्रमक होत शेतकरी बांधवांना सोबत घेऊन थेट प्रकल्प संचालक श्री घोडके साहेब यांच्या दालन गाठले व दरवाजा आतुन बंद करून घेत काम सुरू झाल्या शिवाय आम्ही येथुन जाणार नाही व तुम्हाला जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला व जाब विचारला तेव्हा अधिकार्यांची बांभेरी उडाली तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिले व काम सुरू होताच माऊली हळणवर यांचे सह शेतकऱ्यांनी कार्यालय सोडले यावेळी ज्ञानेश्वर गुडंगे,भारत पांढरे,सुरेश खांडेकर, बिरुदेव खांडेकर, रविंद्र गुंडगे , दत्ता खांडेकर,पपु लवटे, विक्रम रणदिवे यांचे सह शेतकरी उपस्थित होते


0 Comments