LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी नेते माऊली हळणवर यांची कालवा सल्लागार समितीच्या सदस्य पदी शेतकरी प्रतिनिधी म्हणून निवड...

 


आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज माऊली हळणवर यांची निवड केली

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर लढताना अनेक आंदोलनात गुन्हे दाखल झाले  उजनीच्या पाण्यासाठी त्यांनी मोठा लढा उभा केला होता तत्कालीन पालक मंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांच्या विरुद्ध मोठे रान उठवले होते उजनीच पाणी वाचवण्यासाठी त्यांनी अनेक केसेस अंगावर घेऊन सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलने केली होती आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांची निवड करण्यात आली त्यांचे निवड होतात शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अनेकांनी त्यांच्याशी संपर्क साधून अभिनंदन केले यावेळी बोलताना माऊली हळणवर म्हणाले की 

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी मी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न करेन व उजनीचे पाणी पळवणाऱ्या बारामतीकरांच्या विरोधात ठामपणे उभा राहील पालकमंत्री महोदयांनी व भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील सर्वच खासदार आमदार पदाधिकारी यांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला आहे तो विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेल...

उद्या अकरा वाजता नियोजन भवन येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची पहिली बैठक होत आहे या बैठकीला उपस्थित राहण्याचे पत्र त्यांना आजच लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडून प्राप्त झाले आहे...

Post a Comment

0 Comments