LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

नमामी चंद्रभागा आणि नामसंकीर्तन भवन साठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येईल._ ना. सुधीर मुनगंटीवार



पंढरपूर (प्रतिनिधी) म वि आ सरकारच्या काळात बंद करण्यात आलेले नमामी चंद्रभागा आणि नामसंकीर्तन भवन यासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे ठोस आश्वासन नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शुक्रवार दी ३ मार्च रोजी पंढरपूर येथे  पत्रकारांशी बोलताना दिले.

यावेळी माजी आमदार श्री प्रशांत परिचारक उपस्थित होते. पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले, नमामी चंद्रभागा,हा नदी स्वच्छता प्रकल्प ९९५ कोटी रुपयांचा आहे. पुणे, बारामती येथील कारखान्याचे दूषित पाणी नदीत सोडण्यात येते, तसेच विविध प्रकारची घाण सोडण्यात येते, याकरिता ही नदी स्वच्छता प्रकल्प राबविण्यात येत होता.पण म वि आ सरकारला ते मान्य नव्हते, यामुळे सुमारे २ वर्ष काम रखडले होते. तुळशी वृंदावन चे काम पूर्ण झाले,पण आमचे सरकार गेल्याने नमामि व नामसंकीर्तन ही कामे अर्धवट अवस्थेत राहिली. 

नामसंकीर्तन भवन चे काम अप्रतिम झालेले आहे, आपले आयुष्य श्री विठ्ठल रुक्मिणी माते साठी समर्पित करणाऱ्या वारकऱ्यांसाठी ते तयार करण्यात येत आहे.  आ.श्री प्रशांत परिचारक यांच्या कल्पनेतून हे भवन अतिशय सुरेख , देखणे बनत आहे.त्याच्या उर्वरित कामासाठी दि३१ मार्च च्या अगोदर राज्याच्या अर्थसंकल्पात मोठा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे ना. मुनगंटीवार म्हणाले.

यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे वतीने  सह अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी शाल,श्रीफळ, श्री ची प्रतिमा देऊन ना. मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भा ज पा माजी नगरसेविका शकुंतला नडगीरे, ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर,स्थानिक भा ज पा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments