पंढरपूर शहरातील तुळशी वृंदावन येथील संत चोखोबा मेळा यांचे मंदिर पडून गेले आठ दिवस झाले परंतु आत्तापर्यंत मंदिराचे काम चालू करण्यात आले नाही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे येत्या आठ दिवसांमध्ये जर मंदिराचे काम चालू नाही केले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिला आहे .आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपूर येथील वनअधिकारी चैताली वाघ याना संत चोखोबा मेळा मंदिर उभारणीचे काम त्वरित सुरू करावे यासाठी निवेदन देण्यात आले.पंढरपूर शहरात राज्यातून नव्हे तर संपूर्ण देशातून भाविक येत असतात या भाविकांना दिलासा मिळण्यासाठी तसेच विविध संतांचे दर्शन मिळावे म्हणून पंढरपूर शहरांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून तुळशी वृंदावनाची निर्मिती करण्यात आली आहे .या तुळशी वृंदावन मध्ये विविध संतांची मंदिरे उभी करण्यात आली आहेत .गेल्या आठ दिवसांपूर्वी यातील संत चोखोबा मेळा यांचे मंदिर अचानक पडले असून नक्की ते मंदिर कशामुळे पडले याची सखोल चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केली आहे .वास्तविक फक्त तीन वर्षांपूर्वीच या तुळशी वृंदावनाची निर्मिती करण्यात आली असून या ठिकाणी विविध संतांचे मंदिरे बांधण्यात आले आहेत. तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले मंदिर पडले आहे याचा अर्थ या ठिकाणी केलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी देखील धोत्रे यांनी केली आहे. सरकार वेगवेगळ्या मोठ्या घोषणा करत आहे परंतु आपल्या संत महात्म्यांचे मंदिर बांधायला जर सरकारकडे पैसे नसतील तर याच्यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. हवेत गप्पा मारण्यापेक्षा या मंदिराची उभारणी त्वरित करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वखर्चाने या मंदिराची उभारणी करेल असेही दिलीप धोत्रे यांनी सांगितले.
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष संतोष कवडे, उपशहराध्यक्ष गणेश पिंपळनेरकर, विभागाध्यक्ष नागेश इंगोले, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रताप भोसले, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष अवधूत गडकरी इत्यादी उपस्थित होते.


0 Comments