पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर तालुक्यातील सर्वांगीण विकासात्मक दृष्टिकोनाच्या अनुषंगाने पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्राचे *विकासरत्न आमदार मा.समाधान आवताडे* यांच्या माध्यमातून रस्ते विकास योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे. सदर निधी मंजूर करून *आमदार मा. दादासाहेब* यांनी या गावाचा भौतिक प्रगतीपथ अधिक सक्षम केल्याबद्दल तमाम ग्रामस्थांच्या वतीने आमदार महोदय यांचा सत्कार करून धन्यवाद व्यक्त करण्यात आले.
राजकीयष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील गाव म्हणून ख्यातनाम असणाऱ्या बठाण गावातील प्रत्येक नागरिकाच्या दृष्टिक्षेपातील गावाची प्रतिमा साकार होण्यासाठी *आमदार मा. दादासाहेब* यांच्या विधायक संकल्पनेतून आतापर्यंत खूप मोठा निधी मंजूर झाला आहे. कोणतीही राजकीय अभिलाषा डोळ्यासमोर न ठेवता विकासाचा वारू गतिमान करणारे *आमदार महोदय समाधान आवताडे यांचे व्यक्तिमत्व म्हणजे मतदारसंघाच्या प्रगतीचा सन्मानबिंदू असल्याचा निर्वाळा यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.
यावेळी मा.उप सभापती,श्री. विजयसिंह दादा देशमुख, मा.स.श्री.अरुण घोलप, श्री विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक द्रोणाचार्य हाके मेंबर, कासेगाव चे प्रगतशील बागायतदार श्री तुकाराम आबा कुरे, कोर्टी चे विद्यमान उपसरपंच पैलवान महेश येडगे, गट नेते श्री समाधान घायाळ, लक्ष्मण जाधव,श्री. भास्कर {राजाभाऊ} घायाळ, श्री.भिमा आबा भुसे, पत्रकार श्री.अमिन शेख, नवनाथ खोत आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.


0 Comments