पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथील चिमुकला कृष्णा तिमा धोत्रे याचा दोन महिन्यांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता.
एवढे दिवस होऊन देखील या गूढ हत्येचा उलगडा होत नसल्याने आज सोमवार दिनांक २० मार्च रोजी वडार समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.
महात्मा फुले चौक ते तहसील कार्यालय या मार्गाने मोर्चा काढण्यात आला. यामध्ये हजारो वडार तसेच सर्व समाजाचे लोक सहभागी झाले होते.. गूढ प्रकारे मृत्यू झाल्याने कृष्णा धोत्रे यांच्या नातेवाईकांना हा खुनाचा प्रकार असल्याची तक्रार केली होती.पण अद्यापही तपासात काहीच निष्पन्न होत नसल्याने या प्रकरणाची सी आय डी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता तहसीलदार श्री सुशील बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आले. कृष्णा धोत्रे हा केवळ सात वर्षाचा निष्पाप, निरागस बालक होता.
त्याचा खून का करण्यात आला? हे एक कोडे असून यामुळे संपूर्ण पंढरपूर शहर हळहळले . मोठमोठे डिजिटल बॅनर हातात घेऊन घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड या मार्गाने मोर्चा काढण्यात आला. यात मनसे चे श्री दिलीप धोत्रे, माजी नगरसेवक वामन तात्या बंदपट्टे, सुधीर धोत्रे,लखन चौगुले, रामा चौगुले, डि राज सर्वगोड तसेच विविध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.


0 Comments