LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी-अर्जून चव्हाण



पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हाताला आलेल्या पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित करावे तसेच तातडीने सरकारने मदत द्यावी अशी मागणी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केले आहे.

गेली तीन वर्षे झाली सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागाईतदार शेतकरी संकटात आहे. वर्षभर अतोनात प्रयत्न करून, संकटावर मात करून, पोटच्या मुलासारखे बागा सोभाळून जोमाने पिक आणतोय परंतु गेले दोन वर्षे अवकाळी पावसाने संकटात आलेला शेतकरी डोक्यावर कर्जाचा डोंगर असुन सुध्दा यावर्षी पुन्हा आशेने जादा कर्ज घेऊन द्राक्ष बाग सांभाळत होता.

यावर्षी तरी निसर्ग आपल्यावर कृपा करेल आणि चार पैसे मिळतील, कर्जाचा डोंगर कमी होईल या आशेवर शेतकरी राजा स्वप्ने बघत होता परंतु मागच्या दोन दिवसापुर्वी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला, हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला सर्व काही होत्याचे नव्हते झाले.

तेव्हा अशा परिस्थितीत मायबाप सरकारने त्वरीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा करावा आणि त्वरीत त्यांना शासकीय मदत द्यावी अशी मागणी अ.भा. मराठा महासंघाच्या वतीने राज्य सरकार आणि तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

याप्रसंगी अ.भा. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण, महादेव दत्तू काशीद, शिवाजी लक्ष्मण मोरे, सुनील उत्तमराव देशमुख, गुरुदास आबुराव गुटाळ, गणेश प्रभाकर काळे, सचिन बबन थिटे, विठ्ठल केराप्पा ढोणे, नंदकुमार शंकरराव वाघमोडे, अमोल बाळासाहेब पवार, हनुमंत महादेव कदम, सचिन बबन  गंगथडे,भास्कर घायाळ आधी पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments