द्राक्षायन...
भाग - १
पंढरपूर येथे सध्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि आमलकी एकादशी दिवशी झालेला द्राक्ष गायब,या चर्चेला उधाण आले आहे.
यापेक्षा बडवे उत्पात आणि सेवाधारी याचाच कारभार पारदर्शी होता असे आता नित्य नेमाने दर्शनास येणारे भाविक बोलून दाखवत आहेत, मंदिर आता सरकारच्या ताब्यात आहे,पण भक्तिभाव,सचोटी, प्रामाणिकपणा, सचोटी आता राहिली नाही, जरा डोळे उघडे ठेवून नित्योपचार कसे चालतात हे पहिले तर यातना होतील अशी परिस्थिती आहे.या पगारी नोकरांना देवळातील अनेक परंपरा, पद्धती माहीत नाहीत. मन मानेल तसा कारभार चालू असतो, नैवेद्य, आरती नित्योपचार सुरू असताना सीसीटीवी वर कापड टाकले जाते, अशा अनेक गोष्टी आहेत. पण तूर्तास मुद्दा असा आहे की केवळ अर्ध्या तासात एक हजार किलो द्राक्ष गायब कशी झाली? समिती म्हणत आहे की ती भाविकांनी खाल्ली,पण प्रॅक्टिकली ते शक्य नाही आणि पांडुरंगाचा भक्त देवाला अर्पण करायला येतो तिथली द्राक्ष ओरबडयला नाही,
वस्तूस्थिती अशी आहे की येथील कर्मचारी व अधिकारी यांनीच ही द्राक्ष गायब केली.आणि मीडियाने हा मुद्दा प्रकाशात आणल्याने त्यांचा निषेध करून आगपाखड करण्यात आली. मुळात पुरातत्व खात्याने अशी फळांची सजावट करण्यासाठी मनाई केली असतानाही ही सजावट का करू दिली हा मुद्दा आहे. द्राक्ष गायब हे केवळ हिमनगाचे टोक असून खोलात शिरल्यास अनेक गैरप्रकार , खाबुगिरी उघड होईलं. अचानक सोन्याचे दागिने नकली होतात, आणि हे इतक्या उशिराने कळते, यात काय गौड बंगाल आहे याची शासकीय चौकशी होणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षे एक अधिकारी टिकून आहे . त्याची बदली कशी झाली नाही. हे मुद्दे लक्षात घेतले तर काय प्रकार आहे ते लक्षात येईल.
बाकी पुढच्या भागात....



0 Comments