पंढरपूर (प्रतिनिधी)सुप्रसिध्द,लोकप्रिय क्रिकेट खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी नुकतीच पंढरपूर येथील कॅनरा बँक शाखेस सदिच्छा भेट दिली.तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
श्री व्यंकटेश प्रसाद हे आंतरराष्टरीय क्रिकेट खेळाडू असून आपल्या भारतासाठी मोठी अमूल्य कामगिरी करून विजयश्री खेचून आणली आहे. श्री व्यंकटेश प्रसाद यांचा जन्म कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे दि ५ ऑगस्ट १९६९ रोजी झाला.
१९९० साली त्यांचा भारतीय क्रिकेट संघात प्रवेश झाला. प्रसाद हे फिरकी गोलंदाज व दोन्ही बाजूला बॉल वळविण्यात वाकबगार होते. १९९६ साली वर्ल्ड कप क्वार्टर फायनलमध्ये प्रसाद यांनी अभूतपूर्व कामगिरी करून विजयश्री खेचून आणली होती. चेन्नई येथे ही मॅच सुरू होती.पाकिस्तानी खेळाडू अमीर सोहेल याने प्रसाद याच्या बॉलवर चौकार ठोकला आणि सोहेलने प्रसादला खिजविले. यामुळे एकदम शांत राहून व्यंकटेश प्रसाद यांनी पुढच्याच बॉलवर सोहेलचा त्रिफळा उडविला. पाकिस्तान साठी हा क्षण निर्णायक ठरला.येथून संपूर्ण मॅच फिरली व भारताने विजय मिळवला. मात्र पुढे जहीर खान,आशिष नेहरा या खेळाडूंच्या आगमनामुळे प्रसाद यांचे महत्व कमी होत गेले. प्रसाद यांनी दक्षिण आफ्रिका,इंग्लंड, वेस्ट इंडिज संघाविरुद्ध खेळताना एकट्याने ५ विकेट्स घेतल्या आणि भारताला यश मिळवून दिले. त्यांनी ३३कसोटी व १६१ वन डे मॅच खेळल्या.पुढे २००० साली व्यंकटेश प्रसाद सन्मानाने निवृत्त झाले.ते कॅनरा बँकेचे संचालक असून धार्मिक वृत्तीचे आहेत.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतल्यावर ते म्हणाले , पंढरपूर तीर्थक्षेत्र बद्दल खूप ऐकले होते.आज योग आला असून खूप प्रसन्न व आनंदी वाटत आहे.येथे मी प्रथमच आलो आहे.पण आता नेहमी येणार.यावेळी कॅनरा बँकेचे वतीने प्रसाद यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पंढरपूर शाखेचे व्यवस्थापक , कर्मचारी उपस्थित होते.


0 Comments