आक्रमक आंदोलक चेहरा असलेले शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष संदीप सुरेश केंदळे हे एक युवा पिढीतील एकमेवाद्वितीय व्यक्तीमत्व होते. चळवळीतील कार्यकर्ता हा वळीवळीपेक्षा लाभाची अपेक्षा न करता, थेट विषयाला हात घालून चळवळ उभी करुन, सामाजिक आदर्श म्हणूनच पुढे येत असतो. त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे संदिप केंदळे हे होत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा हात जोडून नमस्कार करावा, असा पंढरीतील लहान वयातील कट्टर शिवसैनिक म्हणजे संदिप केंदळे हे होत. संदिप केंदळे यांची अनेक आंदोलने प्रसिद्ध आहेत.
संदिप केंदळेंच्या आंदोलक कृतींची दखल इतिहास घेणार नाही, असे कधीच होणार नाही. याची प्रचिती त्यांच्या मृत्यूनंतर, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ फोन करुन, वैद्यकीय यंत्रणेशी संपर्क साधल्याने, त्यांच्या सहकाऱ्यांना आली.


0 Comments