LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

होळीच्या सणादिवशीच तिघांवर कोयत्याने वार.

 


पंढरपूर (प्रतिनिधी) ऐन होळीच्या दिवशी सोमवार   दि. ६ मार्च पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथील सौ. सुजाता सचिन इंगळे वय वर्ष ३४, पती सचिन छान इंगळे वय वर्षे ४०,आकाश सुनील इंगळे हे सध्या राहणार शेगाव दुमाला तालुका पंढरपूर या तिघांना मागील किरकोळ भांडणाचा मनात राग धरून या तिघांना सोमवार दिनांक ६ मार्च रोजी सकाळी शेगाव दुमाला येथील राहत्या घरात समोर दयानंद शंकर आवाडे वय वर्ष 45 पत्नी जयश्री दयानंद आवाडे वय वर्षे ४०. साहिल दयानंद आवाडे वय वर्ष २०, शुभम दयानंद आवाडे वय वर्ष १८, हर्षद दयानंद आवाडे वय वर्ष १९ हे सर्वजण राहणार शेगाव दुमाला यांनी एकमेकांच्या किरकोळ भांडण झाल्याने सोमवार दिनांक ६ मार्च २०२३ रोजी दुपारी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात एकमेका विरोधात तक्रार दाखल करण्यात आले होते. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दोघांचेही तक्रारी दाखल करून घेतल्या त्यानंतर यातील जखमी सुजाता सचिन इंगळे, पती सचिन छान इंगळे , आणि आकाश सुनील इंगळे यांना तालुका पोलीस ठाण्यातून मेडिकल तपासणी व औषध उपचार करण्यासाठी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय मध्ये पाठवून देण्यात आले होते. यातील आरोपी दयानंद शंकर आवाडे,पत्नी जयश्री दयानंद आवाडे,मुले शुभम दयानंद आवाडे, साहिल दयानंद आवाडे, हर्षद दयानंद आवाडे यांनी वरील जखमीना दुपारी  साडे तीन च्या दरम्यान उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेले असता यातील वरील आरोपींनी व इतर दोघांनी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर आवारात कोयत्याने जबर मारहाण करून जखमी केले आहे या मारहाणीत सुजाता इंगळे हिच्या मानेवर तोंडावर पायावर तर सचिन इंगळे यांच्या डोक्यामध्ये पायावर तसेच आकाश सुनील इंगळे यालाही जबर मारहाण केली असल्याने सध्या हे पंढरपूर येथील खाजगी लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये तिघांवर उपचार सुरू आहे. सदर घटना ही पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील आवारात घडल्याने यातील आरोपी यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू असून सदर आरोपींवर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील कार्यवाही पंढरपूर शहर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments