LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*दि. १४ मार्च २०२३ पासून होणाऱ्या राज्यव्यापी काम बंद आंदोलनामध्ये सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत मधील सर्व कर्मचारी सहभागी होणार*.

पंढरपूर (प्रतिनिधी)


*सोलापूर जिल्हा नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने लाल बावटा कार्यालय सोलापूर येथे जिल्हाध्यक्ष कॉ. सिद्धाप्पा कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली  राज्याचे  जनरल सेक्रेटरी सुनील वाळूजकर, महादेव आदापुरे, नानासाहेब वाघमारे, शिवाजीराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील 17 नगरपालिका नगरपंचायत मधील कामगार संघटनेची बैठक पार पडली यावेळी बोलताना अँड.सुनिल वाळूजकर यांनी सांगितले की,

महाराष्ट्रातील महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी व राज्य शासकीय कर्मचारी संघटना यांच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी हंगामी कर्मचारी यांना सेवेत कायम करावे, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान कामाला समान वेतन द्यावे व तोपर्यंत किमान वेतन देण्याची कारवाई करावी, सन २०१५ पासून नवीन स्थापन झालेल्या नगरपंचायत मधील उद्घोघोषणे  पूर्वीचे व उद्घोघोषणे नंतरचे सर्व कर्मचारी व सफाई कर्मचारी यांचे विनाशर्त विना अट समावेशन करावे नवीन नगरपंचायतीमधील सफाई कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर करावा, नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी यांना दहा वीस तीस ची  आश्वासित प्रगती योजना लागू करावी व इतर मागण्यासाठी राज्य शासकीय कर्मचारी व महानगरपालिका, नगरपालिका.नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी दिनांक १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत  काम बंद आंदोलनाचा करण्यात येत आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील 17 लाख कर्मचारी या संपात सामील होणार आहेत तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व कामगार संघटनेचे पदाधिकारी यांनी हा संपूर्ण यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत व नगरपालिके नगरपंचायत मधील सर्व कर्मचारी संपात सहभागी होतील या दृष्टीने प्रयत्न करावेत शासनाने वेळीच मागण्या मान्य केल्यास वेळ पडल्यास अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगितले यावेळी कॉम्रेड सिद्धाप्पा कलशेट्टी शिवाजीराव पाटील महादेव आदापुरे नानासाहेब वाघमारे धनराज कांबळे सुनील मदने योगेश घंटे यांनी मनोगत व्यक्त केले व सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका या संपात सहभागी होतील असे आश्वासन यावेळी दिले या सभेस सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी बाबासाहेब पवार, नूरउद्दीन खलिफा, अविनाश शिंदे, योगेश घंटे, दादासाहेब बडवे, भिमभगवान किरगल, बाळासाहेब पायगन, किरण वाघमारे, दत्ता कुर्डे व इतर प्रतिनिधी हे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments