LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

खाजगी शाळांवर शासनाने अंकुश ठेवावा. आ समाधान आवताडे.

 


पंढरपूर (प्रतिनिधी)खाजगी शाळांमधून फी वसुलीसाठी मुलांना डांबून ठेवण्याचे अनिष्ट प्रकार होत असून शासनाने अशा संस्थांवर फौजदारी कारवाई करावी. त्यांना शासन निर्णयाची समज देण्यात यावी, अशी मागणी मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंढरपूर - मंगळवेढा आमदार श्री समाधान आवताडे यांनी आज केली.

 खाजगी शालेय शिक्षण पद्धतीमधे फी संदर्भात होत असणारे गैरप्रकार,गैरवागणूक तसेच विद्यार्थ्यांसोबत चालू असणाऱ्या या अनुचित प्रकाराबद्दल प्रश्न उपस्थित करून संबंधित शिक्षण खाते मंत्रीमहोदयांसोबतच सरकार तसेच प्रशासन व पालक वर्गाचे ही लक्ष वेधले. अशा शाळांची मान्यता रद्द करण्यात यावी,


वाघोली ,पुणे येथील मॅक्सीकॅान इंटरनॅशनल स्कूल येथे शैक्षणिक फी भरली नसले कारणाने  शेकडो  विद्यार्थ्यांना एका हॉलमध्ये  अमानवीय व निषिद्ध  प्रकार घडला त्यासंदर्भात   आ आवताडे यांनी  सरकारला वेठीस धरले. सभागृहाला ,शासनाला या फी वसूली संदर्भात घडत असलेल्या अनुचित गैर तसेच गंभीर प्रश्नाबाबत दखल घेऊन यावर कडक कारवाई करणार का?

तसेच अशा खाजगी शालेयआस्थापना ,व्यवस्था यांवर अंकुश रहावा असे अनुचित प्रकार घडू नयेत,बालमनांवर आघात होण्यासारखे प्रकारावर अंकुश ठेवण्याकरिता काय व्यवस्था ,कायदे करण्यात येतील,अशा प्रकारांवरती फौजदारी गुन्हे दाखल होऊन जरब बसविण्यात येईल का?

यासंदर्भात प्रश्न करत  आज पुणे जिल्ह्यात असा दुर्दैवी प्रकार घडला आहे,पण शासनाने यावर काहीच कारवाई केली नाही तर सोलापूर व ईतर जिल्ह्यातही विद्यार्थ्यांना  धरले जाईल..

Post a Comment

0 Comments