LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरीत रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर.

कै.आ.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन.



पंढरपूर/ प्रतिनिधी


अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कै. आ. आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपूर येथील तांबट धर्मशाळा गांधी रोड येथे रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन पंढरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले, डीव्हीपी उद्योग समूहाचे अमर पाटील, पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, किरण भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या उपस्थितीत अखिल भारतीय मराठा महासंघाचे माजी शहराध्यक्ष कै. संदीप केंदळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या शिबिराचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी बोलताना अर्जुन चव्हाण

 म्हणाले की कै. आमदार आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष व कै. आ. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील ५,४३५ उद्योजकांना तसेच पंढरपूर तालुक्यातील १,३९८ उद्योजकांना कर्ज वाटप करून उद्योजक निर्माण करण्याचे कार्य केले जात असल्याचे सांगितले.

या शिबिरास परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

यावेळी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे, शहराध्यक्ष अमोल पवार, कार्याध्यक्ष शिवाजी मोरे, शहर संघटक काका यादव, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष हनुमंत कदम, महिला जिल्हा अध्यक्ष प्रभावती गायकवाड, पंढरपूर तालुका अध्यक्ष रतन थोरवत, पंढरपूर शहराध्यक्ष डॉ. संगीता पाटील, युवती जिल्हाध्यक्ष प्राजक्ता शिंदे, पांडुरंग शिंदे, यशवंत बागल, गणेश काळे, सागर अन्नदाते, राहुल थिटे, सुभाष देवऋषी, वैभव चव्हाण, सिताराम यादव, मोहन गायकवाड, राजकुमार गायकवाड, विक्रम बिस्किटे, विद्याधर भोसले, सोमाकाका भोसले उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments