LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपुरात शिवसेना ठाकरे गटाचे अनोखे गाजर वाटप आंदोलन

 


राज्य सरकारचा अर्थसंकल्प जाहीर होताच पंढरपूर शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून आले शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करण्यासाठी गाजर वाटून अनोख्या पध्दतीने आंदोलन केले यावेळी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा दिला जात नाही परंतु या अर्थसंकल्पात मोठ मोठ्या घोषणा करून शेतकऱ्यांना गाजर दिल्याचे मतं शिवसेना तालुकाप्रमुख संजय घोडके यांनी मांडले,तसेच या अर्थसंकल्पात पंढरपूर मध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी  कोणतीही तरतूद केली नसल्याचे मत मांडत शहरप्रमुख रवि मुळे यांनी सरकारचा निषेध केला, महागाईचा मुद्दा घेत महिला आघाडीच्या संगीताताई पवार यांनी शिंदे सरकाराचा निषेध केला, तसेच या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या,युवकांच्या बेरोजगारांच्या तोंडाला पान पुसण्याचे काम या सरकारने केल्याचे सांगत युवानेते रणजित बागल यांनी सडकून टीका केली युवासेनेच्या वतीने शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर यांनी या अर्थसंकल्पात युवकांसाठी कोणतेही तरतुद केली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत निषेध व्यक्त केला या आंदोलनावेळी उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, तानाजी मोरे,लंकेश बुराडे,विनय वनारे, अविनाश वाळके,उमेश काळे,प्रणित पवार,उत्तम कराळे,गौसपाक आतार, महेश कांबळे,सुरज कांबळे,बालाजी कोळी,बंडू घोडके,संजय पवार,कल्याण कदम,विशाल डोंगरे,बळीराम देवकते,शिवाजी कोष्टी,समाधान जगदाळे, पिंटू गायकवाड, बाळासो पवार कैलास नवले,पप्पू तांबोळी,युवराज नवले,आनंद लोंढे,डॉ अनिल क्षीरसागर व स्वप्निल गावडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments