LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

तुळशी वृंदावन येथील संत चोखामेळा यांचे मंदिर कोसळल्याने संबंधितावर कारवाई करा.....



*ॲड. किर्तीपाल सर्वगोड यांची मागणी.

पंढरपूर (प्रतिनिधी)


         तीर्थक्षेत्र पंढरपूर हे दक्षिणकाशी म्हणून संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे श्री.विठ्ठलp रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो भावी पंढरपुरात येत असतात येणाऱ्या भाविकांना दर्शनानंतर विरंगुळा घेता यावा, संत चरित्र पाहता यावे, शिवाय विठ्ठलाला प्रिय असलेल्या तुळशी पाहता याव्यात यासाठी तात्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथील यमाई तलावाच्या शेजारी कोट्यावधी रुपये खर्चून तुळशी वृंदावन तयार करण्यात आले आहे. या तुळशी वृंदावनाचे सन 2019 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. तुळशी वृंदांमध्ये श्री.विठ्ठलाच्या भव्य मूर्ती सोबत संत चोखामेळा, संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत नामदेव या प्रमुख संतांची मंदिरे संगमरवरी दगडामध्ये उभे करून त्यामध्ये मूर्ती बसवण्यात आली आहे. 

         परंतु येथील तुळशी वृंदावनातील संत चोखामेळा यांचे संगमरवरी मंदिर कोसळण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदरचे काम संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केले असल्यामुळे मंदिर कोसळले आहे म्हणून सदर घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. तसेच संपूर्ण कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावरती कारवाई करण्यात यावी व लवकरात लवकर चांगल्या दर्जाचे संत चोखामेळा मंदिर बांधण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. 

         असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पंढरपूर शहराध्यक्ष ॲड.किर्तीपाल सर्वगोड यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी प्रदेश संघटक सुनिल सर्वगोड, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, पश्चिम महाराष्ट्र नेते आप्पासाहेब जाधव, शहर सरचिटणीस सचिन गाडे, शहर कार्याध्यक्ष विजय खरे, तालुकाध्यक्ष संतोष पवार, अरविंद कांबळे, प्रवीण माने, शहर संपर्क प्रमुख पोपट क्षिरसागर, संघटन सचिव संदेश माने, शहर उपाध्यक्ष सचिन भोरकडे, शहर सचिव अजिंक्य ओहाळ,  समाधान बाबर, विजय वाघमारे, भैया फडतरे,  उमेश सर्वगोड, योगेश रणदिवे, नवनाथ पाटोळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments