LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपुरात पोलिसी खाक्या दाखवण्याची गरज

एकतर्फी प्रेमासाठी मैत्रिणींचा दबाव , तणावातून विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल.

पंढरपूर (प्रतिनिधी) बदलत्या काळानुसार आता प्रेमाची व्याख्या बदलत असून जर कुणी आपल्यावर प्रेम करत नसेल तर त्या व्यक्तीला संपविण्याचा भाषा करून जबरदस्तीने प्रेम करायला भाग पाडले जात आहे. पंढरीत अशाच दबावातून एका मुलीने आत्महत्या केली आहे. दरम्यान वारंवार क्राईम च्या घटना पंढरपुरात घरत असल्याने गुन्हेगारी क्षेत्रातील अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पॉलिसी खाक्या दाखवण्याची गरज निर्माण झाली आहे.

पंढरपूर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून आणि प्रेमासाठी सातत्याने आग्रह धरणाऱ्या मैत्रिणींच्या दबावाला बळी पडून एका अल्पवयीन मुलीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. जीवाभावाच्या मैत्रिणींनीच प्रेमासाठी दबाव टाकल्याची गंभीर बाब पोलिस तपासात उघडकीस येताच शहरात मोठी खळबळ उडाली आहे.



रुपाली बकवाड असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी वैजीनाथ पवार याच्यासह तीन मुलींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अनिल नगर भागात राहणारी रुपाली ही नववी मध्ये शिकत होती.

रुपालीचे आई-वडील हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे दिवसभर रूपाली‌ घरी एकटीच असायची. याच गोष्टीचा गैरफायदा घेत परिसरात राहणारा संशयित आरोपी वैजीनाथ सुनील पवार (वय १९) हा एकतर्फी प्रेमातून रुपालीच्या मागे लागला होता.

मात्र, रुपालीने त्याच्या प्रेमाला अनेक वेळा विरोध केला. दरम्यान आरोपीने तिच्या तीन मैत्रिणींना पुढे करून रुपालीवर प्रेमासाठी दबाव टाकण्यास सुरूवात केली. ही बाब रुपालीने आपल्या आई वडिलांना सांगितली होती. तरीही आरोपी वैजीनाथ याने मयत रूपालीस त्रास देणे सुरूच ठेवले होते.

दरम्यान, रुपालीच्या तीन मैत्रीणींने सुद्धा तिच्यावर प्रेमासाठी दबाव टाकला. वैजीनाथ सोबत प्रेम कर नाहीतर तो घरी येवून तुझ्या आई-वडिलांना संपवून टाकेल, अशी धमकीही मैत्रीणींनी रुपालीला दिली. यातूनच रुपालीने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केली. पोलीस तपासात ही बाब उघडकीस आली. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments