पंढरपूर (प्रतिनिधी) श्रीपुर येथील कर्मयोगी सुधकरपंत परिचारक श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात सहकार भारती व कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने, सहकारी साखर कारखाना सबलीकरण कार्यशाळा गुरुवार दिनांक १८ मे रोजी सकाळी संपन्न झाली.
यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे अध्यक्ष श्री प्रशांत परिचारक , सहकार भारती राष्ट्रीय अध्यक्ष श्री दीनानाथ ठाकूर,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश नाईकनवरे,बी बी ठोंबरे, डॉ उदय जोशी,श्री खताळ,कारखान्याचे एम डी व्यंकटेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे ठाकूर यांनी साखर उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले, जगाच्या पाठीवर सर्वाधिक साखर उत्पादन आपला भारत देश करीत आहे. महाराष्ट्र सह साखर उद्योगाने विविध संस्थांचे जाळे तयार केले आहे. देशात या कामात कुठेही सामाजिक बांधिलकी दिसून येत नाही.
साखर उद्योगाच्या बाबतीत आपण निर्णायक वळणावर आलो असून सिंहावलोकन करण्याची गरज आहे.
सहकार मंत्रालयाचे काम समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री प्रकाश नाईकनवरे यांनी मळी, बगास, प्रेसमड यापासून मिळणारे उत्पंन, तसेच पेट्रोल मध्ये इथेनॉल वापर बंधनकारक केल्यास होणारा कोट्यवधी रुपयांचा नफा यावर माहिती दिली.
प्रास्ताविक एम डी व्यंकटेश कुलकर्णी यांनी केले . यावेळी सर्व संचालक,पदाधिकारी उपस्थित होते.


0 Comments