LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

हुतात्मा शाहिर लालाजी वाघमारे यांना अभिवादन

     बार्शी शहराजळील धामण गावात मारुती वाघमारेहे आपला पारंपरिक व्यवसाय करत. त्यांच्या पत्नीने नाव सोनबाई.  या दांपत्याचा पोटी लालांच जन्म दि. १९ मे १९१५ रोजी झाला. मारुती वाघमारे आपला पारंपरिक नाभिकाचा व्यवसाय करत. लाला मात्र नाभिक व्यवसायात कधीच रमला नाही.  आपल्या सवंगड्याबरोबर पोवाडे रचून गाण्याचा छंद लालांना लागला. ब्रिटिश साम्राज्याच्या गुलामगिरीतून भारत मुक्त झाला पण काश्मीर,  जुनागड आणि हैदराबाद संस्थाने मात्र भारतात  विलीन व्हायला तयार नव्हती. 

     स्वामी रामानंद यांच्या नेतृत्वाखाली हैद्राबाद मुक्ती संग्राम लढा सुरू झाला. निजाम सरकारच्या हद्दीतील पोलीस स्टेशनवर हल्ले करणे, हद्दीतील व्यापाऱ्यांच्या धनधण्याची लूट करून गरीबांना वाटणे, जनजागृती चे कार्य करण्यासाठी राष्ट्रीय पोवाडे, राष्ट्रीय गीत गाऊन स्वाभिमान जागृत करणे आदि कार्य सुरू केले. स्वातंत्र्य चळवळीचे लोण खेड्या-पाड्यात पसरले. 

     या चळवळीत शाहिर  लाला वाघमारे आपल्या साथीदारांसह सामील झाले. स्वतः  हातात डफ घेऊन गावोगावी जाऊन निजामशाहीचा जुलमी कारभार, भारतीय स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार विरुद्ध विरसयुक्त पोवाड्यातून लोकांचा स्वाभिमान जागृत करण्याचे कार्य ते आपल्या पथकामार्फत करू लागले.

Post a Comment

0 Comments