LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

इंचगाव टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा, कारवाईची मागणी

पंढरपूर ( प्रतिनिधी) 


मंगळवेढा येथील इचगाव येथील टोलनाक्यावरील कर्मचारी वाहनधारकांशी उद्धटपणे बोलत असून मनमानी कारभार करीत आहे. या कर्मचाऱ्यांच्या वर कारवाई करण्याची मागणी प्रवाशाच्या वर्गाकडून केली जात आहे.

या ठिकाणी असणारा फास्ट टॅग स्कॅनर वर स्कॅन केले जात नाही. त्यामुळे नंबर वरून मॅन्युअल चा वापरून टॅग  करावे अशी वाहनधारकांची मागणी आहे. सर्व टोल नाक्यावर टॅग स्कॅनर ऐवजी मॅन्युअल  वापरून  वाहन धारकांना प्रवास करता येतो.तशीच सोय या ठिकाणी पण केली जावी.अशी प्रवाशी वर्गाची मागणी आहे.

या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनाची ये जा असते. त्यामुळे या टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनधारकाचा वेळ वाया जात आहे. कर्मचारी व्यवस्थित बोलत नसल्यामुळे कर्मचारी आणि वाहनधारक यांच्यामध्ये वारंवार वाद होताना दिसून येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

तरी या मार्गावरील संबंधित विभागाने,  अधिकार्‍यांनी लक्ष देऊन या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या वर योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे. अन्यथा या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशाराही प्रवाशांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments