_आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पंढरपूर शहर व तालुक्याची बैठक सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख मा.अनिलजी कोकिळ साहेब यांच्या आदेशाने तथा माढा लोकसभा सहसंपर्क प्रमुख मा.साईनाथ भाऊ अभंगराव, जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हॉटेल विठ्ठल इन येथे संपन्न झाली._
_या बैठकीत सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि. भाळवणी च्या होणाऱ्या निवडणुकी संधर्भात वेगवेगळ्या पदाधिकारी यांनी आपले मत व्यक्त केले. या बैठकीत प्रत्येकाची मतेजाणून घेण्यात आली. या बैठकीत समर्पक चर्चा संपन्न झाली, अंतिम निर्णय सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिलजी कोकीळ साहेब यांचा राहणार असून प्रत्येकाने त्या प्रमाणे आपले कर्तव्य बजावयाचे आहे._
_या बैठकीस शिवसेना सोलापूर जिल्हा उपप्रमुख मा.सुधीर भाऊ अभंगराव, जेष्ठ शिवसैनिक मा.जयवंत माने, काकासाहेब बुराडे, तालुका प्रमुख संजय घोडके, शहर प्रमुख रवी मुळे, उपतालुका प्रमुख मा.कल्याण कवडे, मा.विलास चव्हाण, मा.माऊली मासाळ, उपशहर प्रमुख लँकेश बुराडे, विनय वनारे, तानाजी मोरे, सचिन बंदपट्टे, अविनाश वाळके, रणिजित बागल, युवासेना तालुकाधिकारी योगेश चव्हाण, शहर युवाधिकारी श्रीनिवास उपळकर, स्वप्नील गावडे, विभाग प्रमुख उमेश बापू काळे, बाळासाहेब पवार, विजय जाधव, प्रशांत जाधव, महंमद पठाण तसेच बहुसंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते._


0 Comments