सध्या आज सगळीकडेच स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे सगळीकडेच पडघम वाजले आहे. सध्या पंढरपूर तालुक्यातील ८जिल्हा परिषद गट तसेच १६ पंचायत समिती गणासाठी निवडणुका लागल्या आहेत तरी आमदार अभिजीत पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून उमेदवारी अर्ज अधिकृतपणे उमेदवार उभे केले आहेत.
सध्या आमदार अभिजीत पाटील हे सर्व ताकतीनिशीय पंढरपूर व माढा मध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद साठी सर्व उमेदवार उभे केले आहेत. सध्या वाखरी जिल्हा परिषद गटातून काळेनी अर्ज दाखल केला आहे. त्याच अनुषंगाने आज कल्याणराव काळे व समाधान काळे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असता त्याच कल्याणराव काळे गटातीलच माजी पंचायत समिती सदस्य, वाडीकुरोली माजी सरपंच चंद्रकांत पाटील, नंदकुमार पाटील यांनी आमदार अभिजीत पाटील यांच्या गटांमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक सूर्यकांत बागल, विठ्ठल कारखान्याचे संचालक धनंजय काळे, साहेबराव नागणे, शेतकरी संघटनेचे तानाजी बागल, रणजीत बागल, धनंजय बागल, सत्यवान नाईकनवरे, उपसरपंच नागेश घोडके यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट:
कल्याणराव काळे यांनी सतत दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करून दुसऱ्यांदा फेरी सुरू केली आहे त्यालाच कंटाळून त्यांच्यातीलच ज्येष्ठ मंडळींनी आमच्यासोबत काम करण्याचे ठरवले असून त्यांचा जाहीर प्रवेश देखील झाला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर नवी ताकद आणि ऊर्जा मिळाली आहे. विचारधारेचं अनुकरण करून जनतेच्या विकासासाठी नवीन जेष्ठाचं आर्शीवाद आणि तरूण सहकाऱ्यांचं मोलाचं योगदान मिळेल,असा विश्वास आहे.
-आमदार अभिजीत पाटील.

0 Comments