पंढरपूर (प्रतिनिधी) संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या भालवणी येथील सहकार शिरोमणी साखर कारखाना निवडणुकीत काळे भालके गटाने अभिजीत पाटील यांच्या गटाचा धुव्वा उडविलत दणदणीत विजय प्राप्त केला आहे.
यामुळे आता पंढरपूर तालुक्याचे राजकारण बदलणार असून विठ्ठल परिवार पुन्हा जोमाने कामाला लागणार आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीत अभिजीत पाटील यांच्या विजयाने विठ्ठल परिवार विभागाला होता.
अनेकांना अभिजीत पाटील हे चमत्कार करून दाखवतील असे वाटत होते. पण काळे भालके यांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. त्यातच आज सकाळी शासकीय गोदाम येथे मतमोजणी सुरू असताना अभिजीत पाटील यांच्या गाडीच्या काचा फोडल्या तसेच उत्साही कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या कार्यकर्त्यास मारहाण केली. यामुळे वातावरण तंग झाले होते.
पहिलीच विजयी सलामी भटक्या विमुक्त जाती जमाती मधून भारत सोपान कोळेकर यांनी दिली.
तसेच गोरख जाधव, युवराज दगडे, सुनील सराटे, श्री कल्याणराव काळे, परमेश्वर लामकाने, अमोल माने, मोहन नागटिळक, दिनकर कदम, नागेश फाटे, योगेश ताड, तानाजी सरदार, जयसिंह देशमुख, आण्णा शिंदे, संतोष भोसले, राजाराम पाटील,मालन काळे, संगीता देठे, उषा माने, राजेंद्र शिंदे, अरुण नलावडे हे सभासदांचे पॅनल १८५० च्या लीड ने निवडून आले. सहकार शिरोमणी साखर कारखाना निवडणुकीसाठी १० हजार नऊशे एवढे मतदान होते.


0 Comments