पंढरपूर (प्रतिनिधी) विविध गुन्हेगारी कृत्य करून सामान्य नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या पंढरपूर शहरातील पाच युवकांवर २ वर्षसाठी सोलापूर जिल्ह्याबाहेर हद्दपरीची कारवाई करण्यात आली आहे.राजेश उर्फ सागर गोरख कांबळे, रा. व्यास नारायण झोपडपट्टी,पंढरपूर, अमित उर्फ सोनू दशरथ माने, रा. जुनी पेठ,पंढरपूर. पिल्या उर्फ सूरज दशरथ ननवरे, रोहित अरुण कांबळे. रा. गोविंदपुरा, अक्षय बाळकृष्ण धुमाळ, रा. जुनी पेठ यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ अर्जुन भोसले, तत्कालीन उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे, शहर वरिष्ठ पोलिस अधिकारी अरुण फुगे व डी बी पथकातील पोलिस अधिकरी चिमणाजी केंद्रे, राजेश गोसावी, नागनाथ कदम,ढेरे, सूरज हेंबाडे,
शरद कदम, सचिन इंगळे, प्रसाद औटी, शोएब पठाण, सुनील बनसोडे, सचिन हेंबाडे, राकेश लोहार, दादा माने, शहाजी मंडले, समाधान माने, महेश कांबळे यांनी ही कारवाई केली.


0 Comments