LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

काळे गटाच्या प्रचारासाठी महिलांची एन्ट्री

 पंढरपूर प्रतीनीधी 

- पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह साखर कारखान्याची निवडणूक वरचेवर चुरशीची होत चालली आहे. अशातच आता मागील चार दिवसापासून काळे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीआता महिलाही उतरल्या आहेत. पिराची कुरोली येथील पीर साहेब दर्गा येथून नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. 

गावोगावी जाऊन सभासद यांच्या घरी जावून सहकार शिरोमणी वसंतदादा शेतकरी विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. चेअरमन कल्याणराव काळे यांच्या पत्नी संगीताताई कल्याणराव काळे, जयश्रीताई विलासराव काळे, मोनिका समाधान काळे यांनी आपली महीलाची स्वतंत्र प्रचार यंत्रणा सुरू ठेवली आहे.

 या महिलांनी सुरू केलेल्या प्रचारात आतापर्यंत पिराचीकुरोली, टप्पा, चिंचणी, केसकरवाडी, शेडगेवाडी, दसुर या गावात महिला सभासदांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. या महिलांच्या प्रचार यंत्रणामधे उमेदवार उषाताई राजाराम माने, जयश्री शिनगारे, पदमीनी लामकाने, सारीका कौलगे, रुक्मिणी लामकाने,विजया देठे, केशरबाई केसकर, सिमा मासाळ, मनिषा कागदे, महानंद देशमुख, रेखा सातपुते, सिमा शेंडगे, यांचेसह महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments