LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

महर्षी वाल्मिकी संघाचं ‘हटके’ आंदोलन!!

 वाळुचोरीमुळे चंद्रभागेत पडलेल्या खड्ड्यांना ‘पंढरीचं धोतर’

फोटो ओळी : वाळू चोरीमुळे चंद्रभागा नदीमध्ये पडलेला खड्डे धोतराने झाकुन प्रशासनाचा निषेध करताना गणेश अंकुशराव यांच्यासह इतर

पंढरपुर (प्रतिनिधी) : चंद्रभागा नदीमध्ये सतत वाळू चोरी असल्याने नदीमध्ये खड्डे पडुन भाविकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वारंवार येथील वाळू चोरी थांबविण्यासाठी पाठपुरावा करुनही प्रशासनाचे वाळू चोरी कडे दुर्लक्ष असल्याने महर्षी वाल्मिकी संघ ही सामाजिक संघटना आक्रमक झाली असून, आज या संघटनेच्या वतीने चंद्रभागेच्या पात्रात वाळुचोरीमुळे पडलेल्या खड्ड्यांना चक्क ‘पंढरीचे धोतर’ पांघरुन हटके आदोलन करत प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

याबाबत बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी सांगितले कि, चंद्रभागा नदीपात्रातील वाळू चोरी थांबविण्यात यावी म्हणून प्रशासन दरबारी वारंवार पाठपुरावा केला. प्रत्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या बैठकीमध्येही प्रश्न मांडला. यावेळी खुद्द पालकमंत्री यांनी ही वाळे चोरी थांबवा अन्यथा बेजबाबदार अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश दिले होते. परंतु अधिकार्‍यांना पालकमंत्र्यांच्या आदेशाचाही धाक राहीला नसून अद्यापही नदीपात्रामध्ये राजरोसपणे वाळु चोरी सुरूच आहे. वाळु चोरीमुळे नदीपात्रामध्य मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे स्नान करण्यासाठी येणार्‍या भाविकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सध्या आषाढी वारीचा सोहळा काही दिवसांवर येवून ठेपला असून या कालावधीमध्ये कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण ? असा सवाल यावेळी गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केला.

आज चंद्रभागेच्या पात्रातील वाळुचोरीमुळे पडलेल्या खडड्यांना धोतराचे पांघरुन घालत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्या नेतृत्वाखाली वाळुचोरीसंदर्भात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी वारकरी संप्रदयामध्ये महत्व असलेल्या धोतराने नदी पात्रातील खड्डे झाकुन प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

या आंदोलनाप्रसंगी रमेश नेहतराव, संपत सर्जे, नाना अधटराव, सोमा कोळी, प्रिवण अधटराव यांच्यासह महर्षी वाल्मिकी संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments