मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागाचे नंदनवन होण्याच्या दिशेने महत्वपूर्ण असणाऱ्या म्हैसाळ योजनेअंतर्गत असणारे पाणी पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून या भागातील विविध गावांमध्ये पोहचले असून सदर पाण्याचे जलपूजन आमदार यांच्या हस्ते शिवणगी या गावामध्ये ग्रामस्थांच्या साक्षीने संपन्न झाले.
गेली अनेक वर्षे दुष्काळी खाईमध्ये लोटलेल्या मंगळवेढा तालुक्याच्या जनतेला पाणी या संकल्पनेबाबत कमालीची आणि औत्सुक्याची संवेदनशीलता आहे. तालुक्यातील जनतेचा पाण्याचा वनवास संपवून विधायक प्रगतीचे सुवर्णयुग प्रस्थापित करण्यासाठी आमदार महोदय यांनी आत्तापर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. त्यांची अथक मेहनत आणि माय - बाप जनतेचे अलोट प्रेम यांची फलश्रुती आजच्या जलपूजनाने पुनःश्च अधोरेखित झाल्याचे सिद्ध झाले आहे. यावेळी ढोल ताशाच्या निनादामध्ये व भंडाऱ्याची मुक्त उधळून करुन एकमेकांना पेढे भरवत या पाणीपूजनाचा आनंद द्विगुणित करण्यात करण्यात आला.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मा.प्रदीप जी खांडेकर, माजी व्हा चेअरमन मा.अंबादास कुलकर्णी, मा.प्रा.दत्तात्रय जमदाडे सर, माजी जि.प. उपाध्यक्ष मा.दिलीप चव्हाण, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस मा.शशिकांत नाना चव्हाण, माजी उपसभापती मा.धनंजय पाटील गुरुजी आदी मान्यवर तसेच या भागातील विविध गावांचे आजी - माजी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते...


0 Comments