LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

वारकऱ्यांच्या वाहनांना टोल देखील फ्री - मुख्यमंत्री श्रीएकनाथजी शिंदे

पंढरपूर प्रतिनिधी -  

मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या आषाढी वारी पूर्व आढावा बैठकीत वारी संदर्भातील अनेक विषयांवर चर्चा झाली.
 वारीमध्ये अत्यावश्यक असणारे  शौचालयांची कमतरता , स्नानगृह  व वारी मार्गावरील रस्त्यांच्या अर्धवट कामे निदर्शनास आणून दिली.  वारकऱ्यांच्या वाहनांना टोल फ्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदर बैठकीस  पालक मंत्री पुणे व सोलापूर व विभागीय आयुक्त पूणे व सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते. वारकऱ्यांच्या हितासाठी जे जे निर्णय आवश्यक आहेत ते तातडीने प्रशासन म्हणून साहेबांनी घेतले यांवरुन संप्रदायाविषयी असणारी त्यांची तळमळ दर्शनास येते .
  संत ज्ञानेश्वर महाराज , संत निवृत्तीनाथ महाराज  याप्रमाणेच  इतर संतांच्या पालख्यांना सुद्धा सुविधा  देणे क्रमप्राप्त आहे याबद्दल अधिकची माहिती दिली.  स्वतः पालकमंत्री महोदय  संपूर्ण वारी मार्गाचा प्रवास करणार आहे.
 विभागीय आयुक्त यांच्याशी बोलताना मुख्यमंत्री महोदय म्हणाले की, आपणास लागेल ती पूर्ण मदत, आपणास लागेल तेवढी मॅन पॉवर व लागेल तेवढी यंत्रणा  वापरा पण एकाही वारकऱ्याची गैरसोय होता कामा नये  असे आदेश यावेळी त्यांच्याकडून थेट देण्यात आले. ज्या पालखी सोहळ्यामध्ये संख्या कमी आहे  त्या ठिकाणी नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारी  पूर्ण सोहळ्यासोबत देणे गरजेचे आहे. आदी बाबी बैठकी दरम्यान मांडल्या.

Post a Comment

0 Comments