पंढरपूर (प्रतिनिधी)आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शेगाव दुमाला येथील नम्रता हॉटेल मध्ये अवैध दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने शुक्रवार दी १६ जून रोजी सायंकाळी पाच वाजता छापा टाकून २५ हजार १५५ रुपये किंमतीचा माल तालुका पोलिसांनी जप्त केला.
निर्भया पथकाचे पोलिस उप निरीक्षक प्रशांत भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ गायकवाड यांनी छापा टाकून नम्रता हॉटेल चे मालक समाधान बंडू चव्हाण यांच्या वर कारवाई करण्यात आली आहे.
देशी संत्रा, रॉयल स्टाग, रॉयल चॅलेंज, मकडॉवल नं वन, डी एस पी ब्लॅक आदी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.


0 Comments