पंढरपूर (प्रतिनिधी)आज रयत क्रांती संघटनेच्या वतीने महायुती सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्याना दुध दर वाढवून दिलासा दिल्याबद्दल रविवार दि १६ जुलै रोजी सकाळी नामदेव पायरी ,पंढरपूर येथे एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला .
राज्य सरकारने दुधाचा हमी भाव ८/५ ते ८/५ फॅट २५ रूपये ऐवजी ३४ रूपये करून राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्याना न्याय दिला. सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन महिन्यात दुध परिषद झाली रास्ता रोको झाले .त्यामुळे राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेऊन पुणे येथे राज्याचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन दुध दरवाढी समीती स्थापन केली .
या समितीत शेतकरी नेते सदाभाऊ खोत व राज्यातील खाजगी व सहकारी दूध संघाचे चेअरमन होते या समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्त केला. आणि राज्याचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घोषणा केली. तसेच मिटिंग मध्ये राज्यातील दुध भेसळीवर आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील उपजिल्हा अधिकारी व अॅडीशनल एस पी यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमून लवकरच धाडी टाकून कारवाई करण्यात यावी. असे आदेश देण्यात आले आहेत, ज्याप्रमाणे शेती पिकांचा विमा एक रुपयात तसा एक ते दोन रुपयात गाईचा विमा उतरवला जाणार आहे. तसेच पशुखाद्याची किमंत पंचवीस टक्के कमी करण्यात येणार आहे असे आश्वासन दिले आहे रविवारी जल्लोष करताना रयत क्रांती संघटनेचा कार्याध्यक्ष दिपक भोसले, नंदकुमार व्यवहारे, बाळासाहेब बोबडे, रूपेश वाघ ,राहूल पवार ,नेताजी नागणे,बबलू ताड,संतोष शेळके,महेश बचुटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते


0 Comments