LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

व्यापाऱ्याच्या घरात ७ लाख २४ हजाराची चोरी सराईत चोरट्यास २४ तासात अटक .

 


सहा लाख२५ हजार रोकड आणि तेरा हजाराचा मोबाईल जप्त. पंढरपूर (प्रतिनिधी) पढरपूर शहरातील सचिन राजगोपाल कासट  या व्यापा-याचे दुकानात ७,२४,५००/- रूपये चे रोख रक्कमेची चोरी करणाऱ्या संशयित आरोपीस  गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीसांनी २४ तासात आरोपीला अटक करून आरोपीकडून ६,२५,०००/- रूपये रोख व १३, हजार रुपये  किमतीचा   मोबाईल केला जप्त केला आहे.

पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे दि ८ जुलै रोजी फिर्यादी सचिन राजगोपाल कासट, रा. व्यंकटेश नगर पंढरपूर जि. सोलापूर यांनी दिलेल्या फिर्याद नूसार त्यांचे पंढरपूर शहरातील महावीर नगर येथील मे. राजगोपाल पांडूरंग कासट या नावाचे दुकानात दि ०६/ते ०७ जुलै २०२३ या काळात  रात्रीच्या वेळी बंद दुकानातील काउंटर च्या ड्रॉवर मध्ये एकुण ७, २४,५००/- रूपये ची कॅश ठेवलेली होती. सदरची कॅश चोरण्यासाठी  संशयित आरोपीने रात्रीच्या वेळी दुकानातील तिस-या मजल्यावरील खिडकीतुन प्रवेश करून चोरून नेल्याची हकीकत नोंदविली. यावरून  दि ८जुलै रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि क ४४१/२०२३ भारतीय दंड संहिता कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयात कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास करण्याचे आव्हान पोलीसांसमोर उभे राहिल्याने पंढरपूर शहरातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तेव्हा त्याच भागात राहणारा आरोपी सुनिल गजेंद्र चौगुले( वय २७ वर्ष, रा. महावीर नगर, पंढरपूर जि. सोलापूर) याने  नुकताच किंमती मोबाईल खरेदी केला असुन तोच तरुण मोटरसायकल खरेदी करण्याच्या तयारीत असल्याची माहीती पोलीसांना मिळाली. तांत्रिक विश्लेषणाची माहीती व आरोपीबाबत गोपनिय बातमिदारार्फत मिळत असलेली माहीती जुळत असल्याने पोलीसांनी त्याचा धागा पकडून आरोपीला पोलीस खाक्या दाखवला असता आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्याच दिवशी दि ०८ जुलै  रोजी त्याला सदर गुन्हयात अटक केली. असुन आरोपीने चोरून नेलेल्या रक्कमे पैकी पोलीसांनी ६,२५,०००/- रुपये रोख व १३,०००/- रूपये किंमतीचा मोबाईल पोलीसांनी जप्त केला आहे. सदरची कारवी  ही २४ तासात पुर्ण करण्यात आली असुन अटक आरोपीला मा. न्यायालयात हजर केले असता मा न्यायलयाने आरोपीला ०५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


सदरचे अटक आरोपीविरुद्ध यापुर्वी पोलीस रेकॉडला भारतीय दंड संहितेचे कलम ३०७, ३९७, ३९२, ३५३, ४५४, ४५७ असे खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, शासकीय कामात अडथळा व हल्ला,घरफोडी, चोरी असे एकुण ०४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. अटक आरोपी सुनिल गजेंद्र चौगुले याने अशाच प्रकारचे इतर गुन्हे केलेत आहेत का याचा पोलीस कसोशीने शोध घेत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री हिंमत जाधव सो, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर डॉ. अर्जुन भोसले सो पंढरपूर  शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक  अरुण फुगे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय आसबे, स. फौजदार नागनाथ कदम, स. फौजदार राजेश गोसावी, पोहवा शरद कदम, सुरज हेंबाडे, बिपीनचंद्र ढेरे, पोलीस नाईक प्रसाद औटी, सुनिल बनसोड सचिन इंगळे, शोएब पठाण, सचिन हेंबाडे, दादा माने, राकेश लोहार, शहाजी मंडले, समाधान माने यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments