LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आषाढी वारी मंदिर समितीच्या उत्पन्नात ६ कोटी २७ लाखांचे दान.

 


गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्नात वाढ ५७,६३,७२५ ₹

पंढरपूर (प्रतिनिधी )

  आषाढी यात्रेत श्री विठ्ठल भक्तांनी विठुरायाच्या व रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचे दान केले आहे. तसेच सोन्या -चांदीचे कोट्यवधी रुपयांचे दागिने अर्पण केले आहेत. मंदिर समितीला लाडू प्रसाद, परिवार देवता, सोने चांदी भेट , ऑनलाईन देणगी, तसेच भक्त निवास, गोशाळा आदी उत्पन्न स्तोत्रातून भरभरुन दान मिळाले आहे. 

  आषाढी यात्राकाळात  ६ कोटी २७ लाख ६० हजार २२७ रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. अशी माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. 

आजपासून नित्योपचार सुरू

 श्री.विठ्ठलास व श्री.रूक्मिणी मातेस पहाटे होणारी श्री ची काकडा आरती, नित्यपुजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व राजोपचार परंपरेनुसार सुरू करण्यात येत आहेत.

   आषाढी एकादशी वारी मोठ्या उत्साहात पार पडली. या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पायी प्रवास करून पंढरपूरला येतात, यालाच आषाढी वारी किंवा पंढरपूर वारी  म्हटले जाते .

    या वारकरी विठ्ठल भक्तांनी विठ्ठल रुक्मिणी  यांच्या चरणी भरभरून दान केले आहे ,यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपूरला१०ते१२लाख भाविक यात्रा काळात पंढरी नगरीत दाखल झाले होते.


श्री विठ्ठल चरणवरील दान--४५ लाख २३ हजार २१०,

श्री रूक्मिणी चरणावरील दान ---१२ लाख६९हजार१७३, देणगी-२कोटी १३लाख८५हजार१३१, सोने दागिने -१३ लाख ३२ हजार ४७५ रुपये, हंडी पेटीतून १ कोटी ३८ लाख ८१४१,परिवार देवता --५३लाख,४४हजार११७, लाडू प्रसाद --७२लाख,४२हजार२८०, ,विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास ३९लाख हजार ७०,४७९ ,ऑनलाईन स्वरूपात लाख २७ हजार ८७७ , प्रसाद विक्री ७२ लाख ४२ हजार २८० #परिवार देवता  ५३ लाख  ४४ हजार ११७  रुपये  एवढे उत्पन्न मिळाले.

गतवर्षी पेक्षा ५७ लाख   ६३ हजार रुपये उत्पन्न यंदाच्या वर्षी मंदिर समितीस प्राप्त झाले आहे.

Post a Comment

0 Comments