LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पवारांवर टीका अन दोन मिनिटात भाषण गुंडाळावे लागले

 


बीड : मंत्री धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेल्या बीडच्या सभेत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सडकून प्रहार केले. तेलगी प्रकरण, पहाटेचा शपथविधी ते दादांचं नेतृत्व यावरून भुजबळांनी फटकेबाजी करताना शरद पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. संपूर्ण भाषणात भुजबळांनी पवारांना टार्गेट केलं. आधीच लांबलेल्या भाषणाला उपस्थित कंटाळले होते. त्यात भुजबळ एकामागून एक पवारांवर वार करत राहिले. पवारसाहेबांच्या विरोधात सूर निघाल्याने उपस्थित बीडकरांनी गोंधळ केला, त्यामुळे पुढच्या २ मिनिटांत त्यांना भाषण गुंडाळावं लागलं.

सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची... अस्मितेची... सन्मानाची अन् दुष्काळ मिटवण्यासाठीची... अशी टॅगलाईन वापरून धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये जंगी सभेचं आयोजन केलं होतं. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सगळे मंत्रिगण उपस्थित होते. भव्यदिव्य रॅलीने अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे स्वागत करण्यात आले. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अभिवादन केले. जिल्ह्यातील आमदारांची भाषणं संपन्न झाल्यावर प्रमुख नेत्यांनी भाषणं केली. यात भुजबळांनी पवार यांच्यावर बोचरे वार केले. त्यांच्या याच भाषणाविरोधात राष्ट्रवादीचा पवार गट आक्रमक झाला आहे. भुजबळांच्या भाषणाविरोधात आज पवार गटाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

बीडमध्ये मोठं स्वागत झालं पण एका मंत्र्याने त्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर केला, हेही नजरेआड करता येणार नाही. या सभेत जेंव्हा पवार साहेबांच्या विरोधात एका मंत्र्याचे सूर निघायला लागले, त्याला लोकांनीच विरोध केल्याने संबंधित मंत्र्याला दोन मिनिटांत आपलं भाषण गुंडाळावं लागलं. बाकी संपूर्ण सभेत जेंव्हा भाजपाची आरती गायली गेली तेंव्हा बारामतीप्रमाणेच स्वाभिमानी बीडकरांनीही एकही टाळी वाजवली नाही आणि खुर्च्याही रिकाम्या व्हायला लागल्या, यातच सर्व आलं…. कारण बारामती असो किंवा बीड… संपूर्ण महाराष्ट्रातील जनता हुशार आणि स्वाभिमानी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.

Post a Comment

0 Comments