पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अडचणी बाबत आज पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, जनरल सेक्रेटरी अँड.सुनील वाळूजकर, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे सहकार्याध्यक्ष शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, उपाध्यक्ष संतोष सर्वगोड, अँड.किशोर खिलारे, जयंत पवार यांच्या शिष्ट मंडळाने मुख्याधिकारी अरविंद माळी यांना निवेदन देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या व अडचणी बाबत चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने पंढरपूर नगर परिषदेमधील अनेक लिपिक शिपाई व सफाई कर्मचारी सेवा निवृत्त झाले असून अथवा सेवेत असताना मयत झाले आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरची असणारी उपदान व रजावेतनाची रक्कम त्वरित मिळणे आवश्यक आहे कारण सेवानिवृत्तीनंतर सर्व कर्मचाऱ्यांना मुला मुलीची लग्न कार्यासाठी प्रापचिक अडचणी अथवा दवाखान्याच्या उपचारासाठी या रकमांची आवश्यकता असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणी येत आहेत तरी सेवानिवृत्त झाल्यानंतरची मिळणारी सर्व रक्कम त्वरित अदा करावी तसेच नगरपरिषदेमधील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजने अंतर्गत मोफत घरे देण्याबाबत यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, नगर विकास मंत्री व आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने चर्चा झाली होती त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या होत्या सदरचे बैठकीचे इतिवृत्त यावेळी मुख्याधिकारी यांना देण्यात आले तसेच पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी पतसंस्था नंबर १ या संस्थेने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्याकडून कर्ज घेऊन नगर परिषदेमधील कर्मचाऱ्यांना कर्ज वाटप केले आहे सदर काही कर्मचारी सध्या सेवानिवृत्त झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या मिळणाऱ्या रजा वेतन व उपदानाच्या रकमेतून पतसंस्थेचे थकीत राहिलेले ६६ लाख रुपये कपात करून पतसंस्थेत देणे आवश्यक आहे सदरची रक्कम पतसंस्थेस न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी ठेवलेल्या फिक्स डिपॉझच्या रकमा त्यांना वेळेत परत करणे अडचणीची ठरत आहेत तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे घेतलेले कर्जाचे हप्ते वेळेवर जात नसल्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक वारंवार पतसंस्थेच्या मागे या वसुलीसाठी तगादा लावत आहे तसेच सदर सेवा निवृत्त कर्मचारी यांनाही घेतलेल्या कर्जापोटी व्याजांचा निष्कारण भुर्दंड बसत आहे तरी लवकरात लवकर या रकमा पतसंस्थेत कपात करून मिळावेत अशी मागणी केली यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या रजावेतन व उपदानाच्या रकमा येथे दोन-तीन दिवसात दिल्या जातील तसेच सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल व पतसंस्थेची ही रक्कम लवकरात लवकर पतसंस्थेस अदा केली जाईल असे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला दिले यावेळी कामगार संघटनेचे पदाधिकारी धनजी वाघमारे, दिनेश साठे, किशोर दंदाडे, दत्तात्रय चंदनशिवे, महावीर कांबळे,अनिल अभंगराव, प्रीतम येळे,संतोष साळवे,सुमित वाघमारे,दीपक नाईकनवरे हे उपस्थित होते
0 Comments