LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी दिनादिवशी समाजसेवक गणेश अंकुशराव यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

 आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचा प्रश्‍न सोडवा तरंच पंढरपुरात या!

पंढरपुर (प्रतिनिधी) : दि. 9 ऑगस्ट रोजी सबंध जगभरात जागतिक आदिवासी दिन साजरा झाला. पंढरपुरातही आदिवासी कोळी महादेव समाजाच्या वतीने चंद्रभागेच्या वाळवंटातील आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांना इंग्रजांनी अटक केलेल्या ठिकाणी आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या स्मृतीस अभिवादन केल्यानंतर समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गेल्या अनेक वर्षांपासुन आम्ही आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी लढतोय, विविध आंदोलनं करतोय, परंतु शासनाकडून मंजुरी मिळुनही हा प्रश्‍न सुटलेला नाही, त्यामुळे येत्या 26 ऑगष्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात येताना स्मारकाचा हा प्रश्‍न सोडवुनंच पंढरीत यावे अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करुन मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाय ठेऊ देणार नाही! असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी यावेळी दिलाय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यातील अनेक प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याचा धडाका चालवलाय, जनसामान्यांचे प्रश्‍न तातडीने सोडवणारं सरकार अशी त्यांची ख्याती पसरलीय ही बाब आमच्यासाठी निश्‍चितच गौरवास्पद आहे, परंतु सर्वांचे प्रश्‍न तातडीने सोडविणारे मुख्यमंत्री आमच्या आदिवासी समाजाचेच प्रश्‍न का सोडवत नाहीत? असा प्रश्‍नही यावेळी गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केला. यावेळी मणिपुरमधील घटनेचा निषेध करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आदिवासी महादेव कोळी जमातीचा जातीच्या दाखल्यांचा प्रश्‍न, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या चंद्रभागेतील स्मारकाचा प्रश्‍न, चंद्रभागेवरील प्रस्तावित इस्कॉन मंदिरानजीकचा घाट रद्द करण्याचा प्रश्‍न, आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासींच्या हिस्स्याचा 5.4 निधीचा प्रश्‍न, रोटेशन पध्दतीने आदिवासींचे विधानसभेचे व लोकसभेचे मतदारसंघ फिरते ठेवण्याचा प्रश्‍न, चंद्रभागेतील वाळुचोरीचा प्रश्‍न, चंद्रभागेच्या अस्वच्छतेचा प्रश्‍न, उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त डॉक्टरांची पदे भरण्याचा प्रश्‍न व उपजिल्हा रुग्णालयास आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे नांव देण्याचा प्रश्‍न, राज्यातील आदिवासी विभागाचा हक्काचा साडे बारा हजार कोटी एवढा निधी दुसर्‍या विभागाकडे वळवला गेलाय तो हक्काचा निधी आदिवासींना मिळावा, या सार्‍या प्रश्‍नांना सोडवण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न करावे एवढीच माफक अपेक्षा असल्याचे गणेश अंकुशराव म्हणाले. वरील प्रश्‍न जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवले तर ही त्यांच्या कारकिर्दीतील एक खुप मोठी ऐतिहासिक घटना ठरेल! असेही महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव म्हणाले.   

यावेळी पंढरपुर परिसरातील अनेक आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments