LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

बिल्डर कन्हैयालाल देवीचंद जैन यांच्यापासून आमच्या परिवारास धोका - ज्योती जाधव

 


पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर शहरालगत असलेल्या वाखरी येथिल अनंता बाबूराव कैकाडी माने यांची ५२ एकर शेतजमिनीच्या व्यवहारतुन छोरीया प्रॉपर्टीज ॲन्ड डेव्हलपमेंट कंपनीचे भागीदार बिल्डर कन्हैयालाल देवीचंद जैन यांनी फसवणूक केल्याने कैकाडी माने यांनी पंढरपूर येथिल जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली असल्याचे त्यांची मुलगी ज्योती जाधव यांनी सांगितले तर सदर छोरिया प्राॅप्रर्टीज ॲन्ड डेव्हलपमेंट कंपनीचा बिल्डर कन्हैयालाल देवीचंद जैन हा आम्हास कोर्टातील केसेस काढून घ्या नायतर तुमचे अवघड होईल असे त्यांच्याकडील गणेश सुर्वे व इतर काही जनांना पाठवून आमच्या परिवारास शिवीगाळ दमदाटी जिवे मारण्याची धमकी व घर पेटवून देण्याची धमकी देत असल्याने जैन व त्यांच्या माणसांकडून आमच्या परिवाराच्या जिवीतास धोका निर्माण झाल्याची लेखी स्वरूपातील तक्रार ज्योती जाधव यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय व पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे ऑनलाइन पाठवली असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची ज्योती जाधव मागणी केली आहे तसेच गणेश सुर्वे हा हातात काठी घेऊन मारहाण करण्याच्या उद्देशाने सारखा माझ्या वडिलांच्या अंगावर धावून जात होता व माझ्या वडिलांना कायमच संपवतो असे बोलत मोठ मोठ्याने शिव्या देत होता व माझे मालक जैनसाहेब यांच्याकडे भरपूर पैसा आहे आमच्या बरोबर वामन यलमार व खर्चे पोलीस आहेत तुम्ही काही करू शकत नाही असे बोलून गणेश सुर्वे व इतर तीन चार जन निघून गेल्याचेही लेखी तक्रारीत ज्योती जाधव यांनी नमूद केले असल्याचे दिसून येत आहे

Post a Comment

0 Comments