LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची होणार महत्त्वपूर्ण बैठक

प्रतिनिधी/-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पंढरपूर मंगळवेढा दौऱ्यावर शुक्रवारी दि.6ऑक्टोबर2023 रोजी येणार आहेत. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीतच पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक होणार आहे. सदरची बैठक विठ्ठल इन, जुना बसस्थानक समोर पंढरपूर येथे  सकाळी ९वा होणार आहे.

या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी निरीक्षक  शेखर माने, पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अध्यक्ष ॲड. दत्तात्रय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष  नागेश फाटे, पंढरपूर शहराध्यक्ष सुभाष भोसले, तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, कार्याध्यक्ष सुधीर भोसले, तसेच राष्ट्रवादीचे सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी पंढरपूर शहर आणि तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि राष्ट्रवादीचे नेते अभिजीत आबा पाटील यांनी केले आहे...

Post a Comment

0 Comments