पंढरपूर प्रतिनिधी : महाराष्ट्राची दक्षिण कशी समजले जाणाऱ्या पंढरपूर शहरात भर बाजारात फटाक्यांचे दुकाने विक्रीसाठी सुरू आहेत सुरक्षेच्या दृष्टीने नगरपालिकेकडून एका ठिकाणी सर्व दुकाने असावेत असा पर्याय काढून दुकानदारांना त्याच ठिकाणी दुकाने लावल्यास परवानगी दिली आहे मात्र अजूनही पंढरपूर शहरातील भर बाजारात काही दुकाने सुरू असल्याचे दिसून येते त्यामुळे नियमावली कागदावरच राहिले असून प्रत्यक्ष नियम धाब्यावर बसवले असल्याचे दिसून आले.
पंढरपूर शहरात सणावारासाठी लाखो भावीक श्री विठ्ठलाचे दर्शनासाठी पंढरीत येतात त्यांची सुरक्षा पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन काटेकोर प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षेसाठी नगरपालिकेकडून सदर फटाक्यांचे दुकाने एकाच ठिकाणी असावेत यासाठी नगरपालिकेने शहराच्या मध्यवस्तीत जागा उपलब्ध करून दिले आहे तर काही भांडवलशाही असणारे दुकानदार भर बाजारात लोक वस्तीत आपली फटाक्यांचे दुकाने थाटून संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्रास या ठिकाणी फटाक्यांची विक्री करत आहेत.
दरम्यान या फटाक्यांच्या दुकानामुळे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासनाची तारांबळ उडेल तर होणारे नुकसान कोणत्याही इतर दुकानदारास सहन करता येणार नाही यातूनच काही जीवित हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पावले उचलून भर बाजारात असणारे हे फटाक्यांचे दुकाने बंद करावेत अशी मागणी पंढरपुरातील सुजाण नागरिकांमधून होत आहे.


0 Comments